डोकं भंडावणारा थ्रील,आठ वर्षांपूर्वीच्या 'या' सीरिजची बातच काही और

डोकं भंडावणारा थ्रील,आठ वर्षांपूर्वीच्या 'या' सीरिजची बातच काही और

ही भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वोत्तम सायकोलॉजिकल थ्रिलर वेब सीरिज आहे. जी ओटीटीवरच्या सर्वोत्तम सायकोलॉजिकल थ्रिलरपैकी एक आहे. ही सीरिज आठ वर्षांपूर्वी ऑनलाइन स्ट्रीम करण्यात आलेली आणि अजूनही ती अनेकजण पुन्हा पुन्हा पाहतात. ती 2018 मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम झाली होती. ही कथा तीन पात्रांभोवती फिरते: एक असहाय्य वडील आणि त्याचा आजारी मुलगा आणि एक चलाख पोलीस अधिकारी

ही सीरिज एका माणसाच्या आनंदी कुटुंबापासून सुरू होते, पण कथा पुढे सरकत असताना, त्याला कळतं की, त्याचा मुलगा गंभीर आजारानं ग्रस्त आहे आणि त्याला फुफ्फुसाच्या डोनरची आवश्यकता आहे. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी, तो माणूस ऑर्गन डोनरचा शोध सुरू करतो. पण जेव्हा त्याचा शोध अयशस्वी होतो, तेव्हा तो ऑर्गन डोनरच्या यादीत ज्यांनी आधीच आपली नावं नोंदवली आहेत, त्यांना मारण्यास सुरुवात करतो. आतापर्यंत, तुम्हाला कदाचित समजलं असेल की, आपण अभिनेता आर. माधवन आणि अमित साध यांची वेब सीरिज, ब्रीद सीझन 1 (Breathe Season 1) बद्दल बोलत आहोत. ब्रीद ही अमेझॉन प्राइम व्हिडिओवरील टॉप-रेटेड वेब सीरिज आहे.