मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड आक्रमक ; सीपीआर’मधील गैरकारभाराविरोधात १५ दिवसांत सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड आक्रमक ; सीपीआर’मधील गैरकारभाराविरोधात १५ दिवसांत सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

कोल्हापूर प्रितिनिधी - राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) रुग्णालयातील ढिसाळ कारभार, वरिष्ठ डॉक्टरांची अनुपलब्धता आणि रुग्णांची होणारी आर्थिक व मानसिक लूट याविरोधात मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने अधिष्ठाता यांना  एक जाहीर तक्रार निवेदन देण्यात आले. रुग्णालयातील परिस्थितीत येत्या १५ दिवसांत दृश्यमान बदल आणि सुधारणा झाली नाही, तर कोल्हापूरच्या जनतेला सोबत घेऊन तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.

 

​सदर निवेदन मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष अश्विनकुमार वागळे यांच्या मार्गदर्शनाखाली; मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष अजय शिंदे, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष चारुशीलाताई पाटील, कार्याध्यक्ष दीपाताई कोकाटे, मराठा सेवा संघ जेष्ठ सदस्य संजय साळुंखे,मराठा सेवा संघ महानगर अध्यक्ष राहुल इंगवले, संभाजी ब्रिगेड जिल्हा समन्वयक सागर पाटील आणि संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष निलेश चव्हाण आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने दिले.