डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरतर्फे शनिवारी प्रवेश प्रक्रियेबाबत मोफत मार्गदर्शन सेमिनार

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरतर्फे शनिवारी प्रवेश प्रक्रियेबाबत मोफत मार्गदर्शन सेमिनार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चर (स्वायत्त संस्था) वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेबाबत एका विशेष मार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दिनांक १८ जुलै रोजी सकाळी १० वाजता डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर येथे हा सेमिनार होईल. यामध्ये डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.

गेल्या ४२ वर्षांपासून गुणवत्तापूर्ण आर्किटेक्चर शिक्षणासाठी डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय ओळखले जाते. २०२० मध्ये महाविद्यालयाला स्वायत्त संस्थेचा दर्जा मिळाला आहे. शनिवारी होणाऱ्या या सेमिनारमध्ये आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेशी संबंधित सर्व विषयांवर डॉ. गुप्ता मार्गदर्शन करतील.

या सेमिनारमध्ये आर्किटेक्चर शिक्षणाची सद्यस्थिती, या क्षेत्रातील भविष्यातील ट्रेंड, पदवीनंतरच्या करिअरच्या संधी, आरक्षण, नाटा २०२६ च्या निकालाचे विश्लेषण आणि संभाव्य मेरीट लिस्ट नंबर यावर प्रकाश टाकला जाईल. याशिवाय राज्यातील टॉप कॉलेजचा कट ऑफ, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक, आवश्यक कागदपत्रे, ऑनलाइन नोंदणी व कागदपत्र अपलोड करताना घ्यायची काळजी, स्कॉलरशिप, ऑप्शन फॉर्म भरणे आणि प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ मधील महत्त्वाचे बदल याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसनही केले जाईल. हा सेमिनार पूर्णपणे मोफत असून आर्किटेक्चरमधील उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थी व पालकांनी या सेमिनारचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे, अॅडमिशन सेलचे प्रमुख प्रा. रविंद्र बेन्नी व आर्किटेक्चर विभाग प्रमुख प्रा. इंद्रजीत जाधव यांनी केले आहे.