ललित प्रभाकरचा कसाब अवतार चर्चेत; ‘निकाम’ यांच्या भूमिकेत कोण दिसणार?
मुंबई (प्रतिनिधी) : सध्या मनोरंजनसृष्टीत 'ईठा' चित्रपटाची एकच चर्चा सुरु असताना मॅडडॉक फिल्म्सने आणखी एका धमाकेदार चित्रपटाची घोषणा केलीय.'प्रहार: द उज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार आहे.या चित्रपटात मुंबई दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत पकडलेला दहशतवादी अजमल कसाब याची भूमिका मराठी अभिनेता ललित प्रभाकर करणार आहे.

मराठी चित्रपटांमध्ये रोमँटिक भूमिका साकारणारा अभिनेता म्हणून प्रेक्षकांनी ललितला पाहिलं आहे.पण त्याचा कसाबच्या भूमिकेतील लूक समोर समोर आल्याने चाह्त्यांनाही धक्का बसला आहे.ललितच्या या भूमिकेचं सध्या प्रेक्षकांकडून चांगलंच कौतुक होताना दिसतंय.जेष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांच्या भूमिकेत बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता राजकुमार राव दिसणार आहे.नुकताच ललितने त्याच्या इंस्टा अकाऊंटवरही या सिनेमाचा टीझर शेअर केलं आहे.छावा, स्त्री सारख्या सुपरहिट सिनेमांची निर्मिती करणाऱ्या मॅडॉक फिल्म्सने या सिनेमाची निर्मिती केली आहे.या सिनेमाच्या निमित्ताने ललित प्रभाकर आणि राजकुमार राव यांच्या अभिनय बघायला मिळणार आहे.




