राजे साळुंखे चालुक्य राजवंश प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्षपदी प्रतिक साळुंखे यांची निवड
कोल्हापूर (प्रतिनिधी) : देशभरात कार्यरत असणाऱ्या राजे साळुंखे चालुक्य राजवंश प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष पदी प्रतिक राजेंद्र साळुंखे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या निवडीचे अधिकृत पत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. शिवाजी आप्पा साळुंखे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.

प्रतिष्ठानच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या एका विशेष बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. प्रतिक साळुंखे यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामाची, सातत्यपूर्ण सक्रियतेची आणि त्यांच्या दांडग्या लोकसंग्रहाची दखल घेऊन त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली. चालुक्य राजवंशाचा ऐतिहासिक वारसा जपणे, महाराष्ट्रातील युवकांचे खंबीर संघटन करणे, विविध सामाजिक उपक्रम राज्यभरात गतिमान करणे ही त्यांच्या कार्यकाळातील मुख्य उद्दिष्टे असतील, असा विश्वास यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. शिवाजी साळुंखे यांनी व्यक्त केला.
यावेळी पैलवान संजय साळुंखे पाटील, उद्योजक धैर्यशील पुनगावकर, श्रुतीताई पुणगावकर, अवधूत साळोखे, संदीप सावंत, रामराव साळुंखे, जितेंद्र साळुंखे, अतुल साळोखे, जय साळुंखे, संदीप साळुंखे व पदाधिकारी उपस्थित होते. या निवडीमुळे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात साळुंखे यांचं अभिनंदन होत आहे.




