सलमान खाननं 16 किलो वजन का घटवलं? नव्या लूकमागचं कारण काय?

सलमान खाननं 16 किलो वजन का घटवलं? नव्या लूकमागचं कारण काय?

मुंबई (प्रतिनिधी) : सलमान खानचा नवा लूक सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. वजन घटल्यामुळे त्याचा चेहरा पूर्वीपेक्षा सडपातळ दिसत असल्याने चाहत्यांनी त्याच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केली. त्यानंतर सलमाननेही सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांशी संवाद साधला.

दरम्यान, 'अलायन्स' या रिअॅलिटी शोमध्ये सलमान खानने स्वतःच मोठा खुलासा केला. शोमध्ये सोहेल खानने 12 किलो वजन कमी केल्याचं सांगितलं, त्यावर सलमान म्हणाला, मी 16 किलो वजन कमी केलं आहे. यामुळे सलमानने हे वजन कोणत्याही आजारामुळे नव्हे, तर एखाद्या आगामी प्रोजेक्टसाठी कमी केल्याची चर्चा रंगली आहे.

मात्र, सलमानने नेमक्या कोणत्या चित्रपटासाठी वजन कमी केलं आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्याचा नवा लूक आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहते त्याच्या फिटनेसचं कौतुक करत आहेत.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सलमान खानचा 'मातृभूमी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय तो दिल राजू यांच्या प्रोजेक्टवर काम करत असून 'किक 2'देखील त्याच्या आगामी चित्रपटांच्या यादीत आहे. त्यामुळे सलमानच्या नव्या लूकमागे मोठ्या सिनेमाची तयारी असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे.