‘मृत्यूनंतर तो मला भेटायला आला अन् तासन्तास माझ्यासोबत बोलत राहिला’; 6 वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा मोठा खुलासा

‘मृत्यूनंतर तो मला भेटायला आला अन् तासन्तास माझ्यासोबत बोलत राहिला’; 6 वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा मोठा खुलासा

मुंबई (प्रतिनिधी) : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला 6 वर्षे उलटली आहेत. मात्र, त्याचे चाहते आजही त्याला विसरलेले नाहीत. सुशांतचा मृत्यू नेमका कसा झाला, याचं गूढ आजही कायम असल्याचं त्याच्या चाहत्यांकडून बोललं जातं. सुशांतची बहीण श्वेता सिंह राजपूत आजही आपल्या भावाच्या आठवणींमध्ये रमलेली असते. ती तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर भावाचे फोटोही शेअर करत असते. सुशांत हयात नसला तरी त्याची उपस्थिती आजही जाणवत असल्याचं श्वेताने सांगितलं आहे. नुकतीच तिने एका पॉडकास्टमध्ये हजेरी लावली आणि भावाबाबत अनेक गोष्टींचा खुलासा केला.

श्वेताने मुलाखतीत सांगितलं की, तिला सुशांत अनेकदा स्वप्नात दिसतो आणि त्याची उपस्थिती तिला जाणवते. ती आपल्या भावासोबत तासन्तास गप्पा मारत असल्याचंही तिने सांगितलं. सुशांतला मिठी मारल्याचाही अनुभव तिला आला असल्याचं श्वेताने म्हटलं. या गोष्टी सांगताना ती प्रचंड भावुक झाली.

Supertalks By Themovingship सोबत बोलताना श्वेताने भावाबद्दल सांगितलं, "हो, सुशांतच्या निधनानंतर मी त्याला मेडिटेशन आणि ड्रीम स्टेटमधून फिल करते. भावाच्या निधनानंतर मी त्याला फिल केलं आहे. सुशांत सिंह राजपूतच्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी मी पाटण्याला गेले होते. ज्या रुममध्ये मी थांबले होते, तिथे माझ्या भावाच्या अस्थी ठेवलेल्या होत्या."

श्वेता पुढे म्हणाली, "रात्री माझा भाऊ माझ्याशी बोलायला आला होता. तासन्तास तो माझ्याशी बोलत होता. त्याने मला मिठी मारली. माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मी त्याला जे काही विचारलं, त्याने त्याची उत्तरं मला दिली. माझ्या गालावर त्याने किस करून मला मिठी मारली. त्याचा श्वास मी अनुभवत होते."

सुशांतच्या निधनाची बातमी मिळाली तेव्हा आपण कॅलिफोर्नियामध्ये होतो, असंही श्वेताने सांगितलं. "सुशांत आता आपल्यात नाही, हे ऐकताच माझं शरीर सुन्न पडलं. मला रडू कोसळलं. भावाच्या मृतदेहाला अग्नी देण्यात आला. त्यावेळी कोरोना काळ होता. त्यामुळे मी भारतात येऊ शकले नाही. माझ्या भावाला शेवटचा गुडबायही बोलू शकले नाही. त्या रात्री मी खूप रडले होते," असं श्वेता सिंह राजपूत म्हणाली.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या कारकिर्दीतील महेंद्र सिंह धोनी यांच्या जीवनावर आधारित ‘एम.एस. धोनी - द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या सिनेमामुळे सुशांतला विशेष ओळख मिळाली. मात्र, अभिनेत्याच्या निधनानंतर एम.एस. धोनी यांनी सुशांतच्या कुटुंबाशी संपर्क साधला नाही, ही खंत श्वेताने पॉडकास्टमध्ये व्यक्त केली.