राजे साळुंखे चालुक्य राजवंश युवा प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांना शालेय व क्रीडा साहित्य वाटप

राजे साळुंखे चालुक्य राजवंश युवा प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांना शालेय व क्रीडा साहित्य वाटप

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजे साळुंखे चालुक्य राजवंश युवा प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षणमहर्षी परमपूज्य डॉ बापूजी साळुंखे यांच्या स्मृतिदिनानिमित्त श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल, कोल्हापूर येथे विद्यार्थ्यांना शालेय व क्रीडा साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम संस्थेचे कोल्हापूर विभाग प्रमुख व विद्या समितीचे अध्यक्ष डॉ श्रीराम साळुंखे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून क्रीडाप्रेमी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

या कार्यक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना वीस डझन वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला वाव मिळावा यासाठी कॅरम, बॅडमिंटन आणि चेस (बुद्धिबळ) यांसारखे दर्जेदार क्रीडा साहित्य शाळेला सुपूर्द करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमासाठी राजे साळुंखे चालुक्य राजवंश प्रतिष्ठान भारतचे अध्यक्ष प्रा. शिवाजी आप्पा साळुंखे यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी राजे साळुंखे चालुक्य राजवंश युवा प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रतिक साळुंखे, चालुक्य स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष अवधूत साळोखे, पैलवान संजयदादा साळुंखे, बंडा साळुंखे, युवराज साळोखे, संदीप सावंत, अतुल साळोखे, संदीप साळोखे, पूजा साळोखे, यश साळुंखे, बिपीन साळोखे यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.