मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात; लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून स्वागत
कोल्हापूर/प्रतिनिधी: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांचे आज (९ ऑगस्ट) सकाळी ९.४५ वाजता कोल्हापूर विमानतळावर विशेष विमानाने आगमन झाले. विमानतळावर उतरताच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

या प्रसंगी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती.
या वेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अशोकराव माने, आमदार राहुल आवाडे, आमदार शिवाजी पाटील, माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, तसेच श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे / छत्रपती शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजीत घाटगे आणि 'पुढारी' माध्यम समूहाचे योगेश जाधव उपस्थित होते.
प्रशासनाच्या वतीने कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन शर्मा, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, करवीर प्रांताधिकारी मौसमी चौगुले, उपजिल्हाधिकारी संपत खिलारे आणि विमानतळ प्राधिकरणाचे संचालक अनिल शिंदे यांनी मुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्षांचे स्वागत केले.




