प्रीती झिंटाला ब्रेट ली खरंच डेट करत होता? अनेक वर्षांनंतर माजी क्रिकेटपटूचं स्पष्ट उत्तर

प्रीती झिंटाला ब्रेट ली खरंच डेट करत होता? अनेक वर्षांनंतर माजी क्रिकेटपटूचं स्पष्ट उत्तर

मुंबई (प्रतिनिधी) : ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली आणि अभिनेत्री प्रीती झिंटा यांच्याबाबत आयपीएलच्या काळात रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या. किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळताना दोघे अनेकदा एकत्र दिसल्याने या चर्चांना उधाण आले होते. आता अनेक वर्षांनंतर ब्रेट लीने या चर्चांवर पहिल्यांदाच स्पष्ट भूमिका मांडली आहे.

ब्रेट लीने सांगितले की, तो आणि प्रीती झिंटा कधीही रिलेशनशिपमध्ये नव्हते. प्रीती ही माझ्या भारतातील सर्वात जवळच्या मैत्रिणींपैकी एक आहे. आमचं नातं मैत्रीपुरतंच मर्यादित होतं, असे त्याने स्पष्ट केले.

एका मुलाखतीत ब्रेट ली म्हणाला की, मी कधीही कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीला डेट केलेलं नाही. लोकांना जे वाटेल ते समजू शकतात, पण मला सत्य माहिती आहे आणि त्यामुळे मला त्याचा फरक पडत नाही.

2011 मध्ये किंग्स इलेव्हन पंजाब सोडल्यानंतरही ब्रेट लीने प्रीती झिंटाचे कौतुक करत तिला चांगली मैत्रीण म्हटले होते. त्यानंतर दोघांच्या नात्याबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र,आता स्वतः ब्रेट लीने या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे.