झी मराठीवरील अभिनेत्रीनं गुपचूप उरकला साखरपुडा; होणारा नवरा कोण?
मुंबई (प्रतिनिधी) : मे महिना जवळ आला की लग्नसराईला सुरुवात होते. 2026च्या सुरुवातीपासून अनेक कलाकारांनी आपला जोडीदार निवडून नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. प्रसिद्ध कलाकारांनीही या काळात लग्नगाठ बांधली. तर, काहींचा साखरपुडा पार पडला. अशातच आणखी एका टीव्ही अभिनेत्रीनं गुपचूप साखरपुडा उरकला आहे. झी मराठीवरील 'तुला जपणार आहे' ही मालिका प्रचंड गाजत आहे. या मालिकेचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. या मालिकेतील मीरा ही व्यक्तीरेखा प्रचंड गाजली. मीरा ही व्यक्तीरेखा साकारणारी अभिनेत्री महिमा म्हात्रे हिचा नुकताच साखरपुडा पार पडला. अभिनेता रोशन विचारेसोबत तिचा साखरपुडा अगदी थाटामाटात पार पडला. सध्या तिच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.

झी मराठीवरील 'तुला जपणार आहे' ही मालिका घराघरात पोहोचली. या मालिकेनं अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. दरम्यान, 'तुला जपणार आहे' या मालिकेतून प्रसिद्धी मिळवणारी मीरा अर्थात महिमा म्हात्रेनं आपला जोडीदार निवडला आहे. तिचा नुकताच साखरपुडा पार पडला. तिचा टीव्ही अभिनेता रोशन विचारेसोबत साखरपुडा पार पडला. अगदी थाटामाटात दोघांचा साखरपुडा पार पडला. दोघांच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. दोघांच्या साखरपुड्याच्या फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
मीरा अर्थात महिमा म्हात्रेचं नुकताच साखरपुडा झाला. तिनं आपला जोडीदार निवडला. लोकप्रिय अभिनेता रोशन विचारेसोबत लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला. महिमा म्हात्रेचा रिअल लाईफ नवरा रोशन विचारे असून, त्यानं अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. स्वराज्य जननी जिजामाता, खरंच तिचं काय चुकलंय, तुझं माझं जमतंय, यांसारख्या इतर मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे.




