न्यू कॉलेज ऑफ फार्मसी येथे करिअर मार्गदर्शन व उद्योजकता विकास कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर/प्रतिनिधी: श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, उंचगाव, कोल्हापूर येथे 'वेलनेस फॉरएव्हर: डिप्लोमा नंतर फार्मसी मधील संधी' या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेसाठी 'वेलनेस फॉरएव्हर'चे मानव संसाधन अधिकारी निखिल नाईक व विनायक जोशी हे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रातील विविध करिअर संधी, उद्योग क्षेत्रातील अनुभव, बदलते प्रवाह, तसेच स्वयंरोजगाराच्या विविध संधी आणि धोरणांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी, आवश्यक कौशल्ये आणि व्यावसायिक विकास याविषयी वक्त्यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी उपस्थितांशी संवाद साधत आपल्या करिअरसंदर्भातील विविध शंका व प्रश्नांचे निरसन करून घेतले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र बी. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या वेळी प्रा. राजेश कुलकर्णी, प्रा. ऋतुराज देसाई, प्रा. वैशाली यादव, प्रा. काजल मोहिते, प्रा. अंजली महाडिक यांसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्रा. साक्षी माने, प्रा. धनश्री रावल व प्रा. रोहिणी कोंडुसकर यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना करिअर नियोजन व उज्ज्वल भविष्यासाठी योग्य दिशा मिळाली.




