श्री आनंदाराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये महिला सुरक्षा व करिअर जनजागृती विषयावर विशेष मार्गदर्शन
गारगोटी (प्रतिनिधी) श्री आनंदाराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक) येथे महिला दक्षता समितीच्या वतीने महिला सुरक्षा व करिअर जनजागृती या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून क्रांती पाटील (API), प्रशांत गोजरे (Assistant Police Officer) तसेच भैरवनाथ पाटील (Constable) उपस्थित होते.

मान्यवरांनी विद्यार्थिनींना महिला सुरक्षा, महिलांचे अधिकार व कायदे, आत्मसंरक्षण, आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची काळजी तसेच करिअरविषयक विविध संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी श्री आनंदाराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. उमेश पाटील ॲडव्हायझर धीरज देसाई पॉलिटेक्निक हेड प्रा. कविता कुरळे तसेच ट्रान्सपोर्ट इन्चार्ज विजय फासके तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
या उपक्रमास संस्थेचे अध्यक्ष माननीय अर्जुन आबिटकर यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच त्यांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमातून विद्यार्थिनींमध्ये महिला सुरक्षा, आत्मविश्वास, स्वसंरक्षण आणि करिअर नियोजनाबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण झाल्याचे मान्यवरांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी महिला दक्षता समितीचे अभिनंदन केले.




