नूतनीकरण केलेल्या कार्यालयात महापौर रुपाराणी निकम यांचा गुरुवारी प्रवेश
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर रुपाराणी निकम यांच्या महापालिकेतील नूतनीकरण करण्यात आलेल्या महापौर कार्यालयाचा प्रवेश समारंभ पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडीक, आमदार अमल महाडीक व आमदार विनय कोरे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडीक, प्रा. जयंत पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम तसेच कोल्हापूर महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमास उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, उपसभापती दीपा ठाणेकर, प्रभाग समिती सभापती वैभव कुंभार, अनुराधा खेडकर, संजय मोहिते, विशाल चव्हाण, आरोग्य विशेष समिती सभापती सुरेखा ओटवकर, उपसभापती वैभव माने, पाणीपुरवठा विशेष समिती सभापती संगीता सावंत, उपसभापती दीपा काटकर, प्राथमिक शिक्षण समिती सभापती शिला सोनुले, उपसभापती पूजा पोवार, क्रीडा समिती सभापती विजयसिंह खाडे-पाटील, उपसभापती रोहित कवाळे, विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, सभागृह नेता मुरलीधर जाधव, गटनेते शारगंधर देशमुख, आदिल फरास, इंद्रजित बोंद्रे, प्रतिज्ञा उत्तुरे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.




