डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्यांचा वापर करा – पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील

डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्यांचा वापर करा – पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील

(करवीर प्रतिनिधी )कोगे तालुका करवीर येथे पाडळी खुर्द,कोगे, महे , जरगवाडी या गावातील सर्व तरुण मंडळांना गणेशोत्सव सणाच्या निमित्ताने आगामी गणेशोत्सव शांततेत आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवून मंडळांनी गणेशोत्सव साजरा करावा, तसेच मंडळांनी डॉल्बीला फाटा देऊन पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, असे आवाहन करवीर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक श्वेता  पाटील यांनी केले.कोगे येथील ग्रामपंचायत हॉलमध्ये ही मीटिंग आयोजित केली होती 

यावेळी बोलताना उपनिरीक्षक श्वेता पाटील म्हणाल्या भारतातील नियामक मानके केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे लागू केलेल्या दोन्ही प्रदूषण(नियमन आणि नियंत्रण)2000 अन्वये ध्वनी मर्यादा औद्योगिक क्षेत्र 75 डेसिबल (दिवसा) 70 डेसिबल (रात्री),व्यावसायिक क्षेत्र (65) डेसिबल दिवसा 55 डेसिबल (रात्री),निवासिक क्षेत्र 55 डेसिबल (दिवसा) 45 डेसिबल (रात्री),शांतता क्षेत्र शाळा व रुग्णालयाजवळ 50 डेसिबल (दिवसा) 40 डेसिबल (रात्री) या मर्यादेची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कठोर कायदेशीर केली जाईल,असा स्पष्ट इशारा देण्यात आला. बीट अंमलदार किरण वायदंडे व रजनीकात कांबळे यांनी समाज प्रबोधन,सांस्कृतिक व पारंपारिक वाद्याचा वापर करून एक नवा पायंडा पाडावा असे सांगितले .

    यावेळी पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील मॅडम, बीट अंमलदार किरण वायदंडे व रजनीकांत कांबळे आणि देसाई, कोगे व महे गावचे पोलिस पाटील दतात्रय मिठारी,पाडळी खुर्द गावचे पोलीस पाटील अर्चना सुरेश पाटील,पाडळी खुर्द,कोगे,महे,जरगवाडी या गावातील सर्व तरुण मंडळाचे कार्यकर्ते व सदस्य उपस्थित होते.