मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांना अभिवादन
कोल्हापूर प्रतिनिधी : मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांना येथील अक्षर दालन आणि निर्धारच्यावतीने शुक्रवारी स्मृतिदिनी अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथ निवड समितीचे सदस्य डॅा. आशुतोष देशपांडे आणि प्रा. सी. एम. गायकवाड यांच्या हस्ते सावंत यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

१८ सप्टेंबर २००२ साली मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपद निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेले सावंत हे प्रचारासाठी गोव्याला गेले होते. त्या ठिकाणी त्यांना ह्दयविकाराचा झटका आला होता. तेव्हापासून निर्धारच्यावतीने त्यांचा स्मृतीदिन साजरा करण्यात येतो. समीर देशपांडे यांनी यावेळी सावंत यांच्या साहित्य कर्तृत्वाचा आढावा घेतला. यावेळी रवींद्रनाथ जोशी, संदीप मगदूम, निवास तोडकर, अमेय जोशी, वसंत पाठक उपस्थित होते.




