जिल्हा परिषद कोल्हापूर येथे प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी

जिल्हा परिषद कोल्हापूर येथे प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी

कोल्हापूर/प्रतिनिधी: समाजसुधारक, विचारवंत, लेखक व प्रखर वक्ते केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती आज जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमावेळी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती विद्या विलास पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य संग्रामसिंह कुपेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

प्रबोधनकार ठाकरे यांनी आपल्या प्रखर लेखणी आणि विचारांच्या माध्यमातून समाजातील विषमता, अंधश्रद्धा आणि अनिष्ट रूढी-परंपरांविरुद्ध सातत्याने जनजागृती केली. समाजप्रबोधन आणि सामाजिक सुधारणेसाठी त्यांनी दिलेले योगदान अत्यंत प्रेरणादायी असून त्यांच्या जयंतीनिमित्त उपस्थितांनी त्यांच्या कार्याचे व विचारांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केले.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य अतिश शिंगे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव तसेच विलास पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेतील इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.