मनोज जरांगे यांचा 'रिॲलिटी शो' संपला, ते आता कधीच मान वर काढणार नाहीत ; गुणरत्न सदावर्ते यांचा घणाघाती दावा
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी २० दिवसांनंतर आपले उपोषण मागे घेतल्यानंतर, प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर अत्यंत कडक शब्दांत हल्ला चढवला आहे. जरांगे यांचा आता ‘रिॲलिटी शो’ संपला असून, ते कधीही राजकीयदृष्ट्या उभे राहणार नाहीत, असा दावा सदावर्ते यांनी 'डंके की चोट पर' केला आहे.

डायरेश-प्रोड्युसरवर गंभीर आरोप
मनोज जरांगे यांनी गेल्या २० दिवसांपासून सुरू केलेला उपोषणरूपी रिॲलिटी शो आज संपला, अशी टीका करत सदावर्ते म्हणाले की, "या शोचे डायरेक्टर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर प्रोड्युसर उदय सामंत होते, त्यामुळेच हा शो फ्लॉप गेला." तसेच जरांगे आता कधीच मान वर काढणार नाहीत, असा दावा त्यांनी केला. तीन महिन्यांचा अल्टिमेटम देणाऱ्या जरांगेंना गणपती भक्तांचा डोस मिळाला असून, आता ते दवाखान्याकडे निघाले आहेत, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.
निजामांची कागदपत्रे आणि आरक्षणावर आक्षेप
आरक्षəच्या मागण्या घटनाबाह्य असल्याचे स्पष्ट करत सदावर्ते म्हणाले की, संविधान आणि कायद्याच्या चौकटीत एका समाजाला तीन-तीन वर्गांमध्ये मागास घोषित करता येत नाही. एका वर्गाला एकाच ठिकाणी जाता येते, तसेच निजामांच्या कागदपत्रांवर जात प्रमाणपत्र मिळू शकत नाही. जरांगे सरड्यासारखे रंग बदलत असून, मुंबईत अल्टिमेटमसारखे शब्द चालणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.
जरांगे यांचे 'पानिपत' झाल्याचा दावा
जरांगे यांच्या बोलण्याला आता कवडीचीही किंमत राहिली नसल्याचे सांगत सदावर्ते म्हणाले की, हेकडीच्या भाषेत बोलणाऱ्या जरांगे यांचे आता पानिपत झाले असून त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. मागच्या वेळी गुलाल उधळला होता, पण यावेळी गुलाल उधळण्याचा लपंडावही पाहायला मिळाला नाही, असा टोला त्यांनी शेवट वळवला.




