निदा खान ज्या घरात लपून बसली होती, दरवाजा उघडताच धक्कादायक गोष्टी समोर

निदा खान ज्या घरात लपून बसली होती, दरवाजा उघडताच धक्कादायक गोष्टी समोर

नाशिक (वृत्तसंस्था) : नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय देणाऱ्या एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर पालिकेकडून अखेर कारवाई करण्यात आली.निदा खानला आश्रय देण्यात आलेलं घर अनधिकृत असल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर पालिकेने मतीन पटेल यांच्या घरावर कारवाई केली.निदा खान ज्या घरात लपून बसली होती. त्या घराचा दरवाजा उघडला तेव्हा घरात मेणबत्त्या पडलेल्या दिसल्या.

निदा खान या घरात लपलेली असताना घरातील विजेचा वापर केला जात नव्हता.कुणालाच कळून येऊ नये, यामुळे निदा खान घरातील कोणतीही लाईट चालू करत नव्हती.निदा खान घरात मेणबत्ती लावून राहत होती. आज जेव्हा पालिकेचे अधिकारी दरवाजाचा कुलूप तोडून घरात गेले, तेव्हा मेणबत्त्या आढळून आल्या.

नाशिकमधील टीसीएस कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला 7 मे रोजी छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली होती. मतीन पटेलने तिला आपल्या घरात आश्रय दिला होता.

यानंतर 9 मे रोजी महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस बजावली होती आणि 72 तासांत उत्तर मागितले होते.आज मतिन खानच्या त्या घरावर देखील बुलडोजर चालवण्यात आलं.सदर प्रकरणात निदा खानचा देखील महत्वाचा सहभाग होता, असा ठपका राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालात ठेवण्यात आला आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाने 50 पानी अहवाल सादर केला आहे. यामध्ये निदा खानने इतर आरोपींसह महिलांचा छळ केला.जाळ्यात अडकलेल्या मुलींना निदा खान धार्मिक शिकवण द्यायची, असं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच कंपनीच्या पॉश समितीनेही नाशिक युनिटला भेट दिली नसल्याचं उघड झालं आहे.