समाज कल्याण विभागाकडील सर्व योजना प्रभावीपणे राबवा- सभापती श्रद्धा गायकवाड

समाज कल्याण विभागाकडील सर्व योजना प्रभावीपणे राबवा- सभापती श्रद्धा गायकवाड

कोल्हापूर( प्रतिनिधी): समाज कल्याण विभागातील सर्वच योजना अतिशय प्रभावीपणे राबवाव्यात अशा सूचना   सभापती श्रध्दा गायकवाड  यांनी आज झालेल्या समाज कल्याण समिती सभेत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

 कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीच्या सभापतीपदी  निवड होण्यासाठी  आपण सर्व सदस्यांनी केलेले सहकार्य अत्यंत प्रेरणादायी ठरणार असून याच प्रेरणेतून समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून जिल्हयाचा विशेषतः ग्रामीण भागाचा सर्वांगीन विकास करण्यासाठी सदैव कटीबध्द असल्याचे सभापती गायकवाड यांनी सांगितले.

    तसेच जिल्हा परिषदेच्या स्वनिधी मधील योजना व अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करण्यासाठीच्या योजनांबाबत निर्णय पुढील सभेमध्ये घेण्यात येतील अशी या सभेत चर्चा झाली.जिल्हा व तालुकास्तरावरील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी चांगल्या प्रकारे काम करावे अशा सूचना देण्यात आल्या. 

  यावेळी  सचिन साळे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, कोल्हापूर व अतुल आकुर्डे मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जि.प. कोल्हापूर यांनी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे व जिल्हा परिषद स्वनिधीबाबत मार्गदर्शन केले.

   या सभेस समाज कल्याण समिती मधील सर्व  सदस्य व सचिव राजेंद्र माने  व तालुकास्तरावरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.