हा तर सरळ सरळ स्व. आमदार पी. एन. पाटील साहेबांचं नाव पुसून टाकायचा डाव

हा तर सरळ सरळ स्व. आमदार पी. एन. पाटील साहेबांचं नाव पुसून टाकायचा डाव

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. आरोप प्रत्यारोप होत आहेत. याच पार्श्वभूमीवर निगवे खालसा जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवार संदीप पाटील( कुर्डूकर) यांनी एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केले आहे. त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात अस म्हंटल आहे. उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थांची रनधुमाळी सुरु झाली आणि स्व. आमदार पी. एन. साहेबांचं नाव पुसून टाकायचा एक छुपा अजेंडा सुरु झाला. खरंतर साहेबांचे राजकीय आणि वैचारिक वारस म्हणून ज्या राहुल भैय्या आणि राजेश दादांकडे बघितलं जातं त्यांनी विधानसभेतल्या निसटत्या पराभवातून उभारी घेऊन लोकांच्या सेवेसाठी स्वतःला सज्ज केलं होतं. दरम्यानच्या काळात राजकीय ताकत आणि साहेबांनी तयार केलेल्या, जपलेल्या आणि जीव लावलेल्या जिवाभावाच्या माणसांची राजकीय आणि सामाजिक गैरसोय होऊ नये म्हणून अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायचा निर्णय घेतला. या प्रवेशानंतर लोकांची कामे होऊ लागली, मतदारसंघात भरीव निधी मिळू लागला,भोगावती कारखाण्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना राज्यातील उच्चांकी दर देता आला. हे सगळं करत असताना पी. एन. साहेबांच्या स्वप्नातला आदर्शवत मतदारसंघ साकारण्याच्या दृष्टीने भैय्या काम करत होते.भैय्या आणि त्यांचा सहकार्यांना राजकीय त्रास व्हावा म्हणून साहेबांचाच फोटो आणि त्यांचं नाव वापरून काँग्रेस चिन्हावरील उमेदवार उभे करून मतदारसंघातील लोकांना विनाकारण विचलित करण्याचं कामं सुरु आहे.

 आज माझ्यासारखा एक नागरिक साहेबांच्या पश्चात राहुल भैय्यांच्यामध्ये साहेबांना बघतोय. आज आमच्यासाठी धर्माने आणि कर्माने साहेबांचा खरा वारसदार म्हणजे भैय्या असं समीकरण आम्ही मानतोय. साहेबांचं कर्तृत्व केवळ एका पक्षासाठी नसून ते समाजातल्या प्रत्येक घटकासाठी होतं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याने मोठ्यांना सांगावं हे खरंतर खूप मोठं समाजिक दुर्दैव म्हणावं लागेल.साहेब हयात असताना काही मंडळींकडून त्यांचा राजकीय अपमान करण्याचे प्रकार झाले, काँग्रेसमध्ये राहूनच साहेबांनी दिलेले काँग्रेसचे उमेदवार पाडण्याचे प्रकार झाले, त्यावेळी साहेबांची किंमत आणि काळजी वाटत नव्हती का? साहेब जिल्हाध्यक्ष असताना त्यांचे फोटो कधी लावावेसे वाटले नाहीत का? हयात असताना जो मान जी ताकत साहेबांना द्यायला पाहिजे होती त्यावेळी साहेबांचं आणि पर्यायाने गटाचं खच्चीकरण करण्यात आलं आणि आज अचानक साहेबांच्यावरील प्रेम उफाळून आलेलं दिसतंय. हेच प्रेम साहेब जिवंत असताना दाखवलं असतं तर आम्हालाही आनंदच झाला असता. एकीकडे साहेबांच्या निष्ठेचे दाखले द्यायचे आणि दुसरीकडे ज्या पक्षाने साहेबांचा पराभव केला त्याच पक्षाला मदत होईल असं काम करायचं हे बघून साहेबांच्या आत्म्याला काय त्रास होत असेल याचाही कधीतरी विचार करावा. शेवटी काय, साहेबांना तुमच्या राजकीय सोयीसाठी वापरणे बंद करावे हीच आम्ही विनंती करू शकतोय. साहेबांचा गट अडचणीत येण्यासाठी साहेबांचं नाव आणि फोटो वापरला जातोय हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कधीच पटणार नाही, त्यामुळं जशी आमची निष्ठा स्व. आमदार पी. एन. साहेबांच्या पायाशी होती तीच निष्ठा आम्ही राहुल भैय्या आणि राजेश दादांसोबत ठेऊ. साहेबांच्या जिवंतपणी नाही निदान त्यांच्या मृत्यूनंतर तरी त्यांना सुखाने राहू द्या एवढीच अशी विनंती संदीप पाटील (कुर्डूकर) उमेदवार - निगवे खालसा जिल्हा परिषद गट यांनी केली आहे.