कोरे अभियांत्रिकी स्थापत्य विभाग आयएसएसइ यांच्यात सामंजस्य करार
वारणानगर (प्रतिनिधी): येथील तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत इंडियन सोसायटी फॉर स्ट्रक्टकरल इंजिनीअर्स (आयएसएसइ), कोल्हापूर लोकल सेन्टर यांच्या संयुक्त विद्यमाने आयएसएसइ विद्यार्थी शाखेचे उद्घाटन आणि सामंजस्य करार झाला.

या सामंजस्य करारामुळे विद्यार्थ्यांना सेमिनार, कार्यशाळा, तज्ज्ञ व्याख्याने आणि विविध तांत्रिक उपक्रमांच्या माध्यमातून तांत्रिक ज्ञान व आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळणार आहे.उद्योग क्षेत्राची प्रत्यक्ष माहिती, नेतृत्वगुणांचा विकास संरचनात्मक अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअरविषयक मार्गदर्शन उपलब्ध होणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी यांनी दिली.
यावेळी आयएसएसइ कोल्हापूर लोकल सेन्टरचे अध्यक्ष प्रशांत हडकर, संचालक डॉ. रश्मी जाधव, उपाध्यक्ष मंदार आंबेकर, प्राचार्य डॉ. डी. एन. माने, स्थापत्य अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. धनराज पाटील, समन्वयक पी. बी. फाळके उपस्थित होते.
वारणा समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे, वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी एन. एच. पाटील, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी शुभेच्छा दिल्या.




