शिवाजी विद्यापीठात ए.आय ( A.I) चे विशेष विविध सर्टिफिकेट कोर्स चालू करावेत - कोल्हापूर युवासेना (उबाठा)

शिवाजी विद्यापीठात ए.आय ( A.I) चे विशेष विविध सर्टिफिकेट कोर्स चालू करावेत - कोल्हापूर युवासेना (उबाठा)

कोल्हापूर (प्रतिनिधी) - आजच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे तंत्रज्ञान जगभरात सर्व क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवत आहे. आजचे युवक जागतिक स्पर्धेत उतरावेत, नाविन्यपूर्ण स्टार्टअप्स निर्माण करावेत, आणि AI चा जबाबदार वापर करावा, यासाठी AI शिक्षणाचा व्यापक प्रसार ही काळाची गरज आहे. शिवाजी विद्यापीठात ए.आय ( A.I) चे विशेष विविध सर्टिफिकेट कोर्स चालू करावेत  अशी मागणी कोल्हापूर युवासेना (उबाठा) गटाच्या वतीने करण्यात आली. 

युवासेनेकडून पुढील मागण्या करण्यात आल्या - 

1) स्वतंत्र ‘AI सर्टिफिकेट कोर्स शिवाजी विद्यपीठा मध्ये करून कोणत्याही शाखेतील किंवा बाहेरील युवकांना प्रवेश मिळेल असे Short-term व Long-term ए,आय कोर्स सुरू करावेत.

2) युवकांसाठी AI कौशल्य विकास केंद्र सुरु करावे.

3) विद्यापीठात ‘AI Skill Development & Innovation Center’ स्थापन करावे, जिथे युवकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण व प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल.

4) हे कोर्स करत असताना ए. आय चा गैरवापर टाळण्यासाठी ‘AI Ethics Policy’ तयार करावी.

5) विद्यार्थ्यांना डिजिटल साक्षरता, प्रायव्हसी व सायबर सुरक्षा याबाबत प्रशिक्षण द्यावे.

6) AI चा वापर करून व्यवसाय कसा करत येईल त्याबाबत मार्गदर्शन करणारे शिबीर आयोजित करावे.

अशा ए. आय संदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन आज शिवाजी विद्यापिठाचे रजिस्टार डॉ. व्ही. एन. शिंदे यांना शिवसेना युवा सेनेच्या वतीने देण्यात आले. हे निवेदन युवासेना समन्व्यक रोहित वेढे यांच्या संकल्पनेतुन देण्यात आले.

यावेळी सर्व युवासेनेच्या पदाधिकारी यांनी रजिस्टार व्ही. एन. शिंदे यांच्याशी संवाद साधला, यावर त्यांनी लवकरच या मागणीचा सकारात्मक विचार करून मार्गी लावू असे आश्वासन दिले.

यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख मंजित माने, युवती जिल्हा युवा अधिकारी कृष्णा जाधव, युवासेना जिल्हा चिटणीस चैतन्य देशपांडे, शहर युवा अधिकारी सुमित मेळवंकी, शहर समन्व्यक अक्षय घाटगे,शहर चिटणीस अभिषेक दाबाडे, प्रथमेश देशिंगे,शहर सह समन्व्यक शुभम पाटील,शहर युवतीअधिकारी सानिका दामूग डे,उपशहर युवाअधिकारी अक्षय मोरे, उपतालुका युवा अधिकारी संकेत गुरव,विभाग युवाअधिकारी आदित्य जाधव, ऋषिकेश जोशी,अनिकेत गुरव, जयवंत वडगावकर आदी उपस्थित होते.