शरद कृषीच्या करणसिंग चव्हाणची क्रिकेट संघात निवड

शरद कृषीच्या करणसिंग चव्हाणची क्रिकेट संघात निवड

दानोळी - जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालयातील युवा अष्टपैलू क्रिकेटपटू करणसिंग चव्हाण यांची सौराष्ट्र विद्यापीठ गुजरात (राजकोट ) येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धेसाठी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठच्या संघात निवड झाली आहे. खेळाबद्दल असलेली निष्ठा, सातत्यपूर्ण सराव आणि संघर्षाच्या जोरावर करणसिंगने हे यश संपादन केले आहे. 

या निवडीबद्दल संस्थेचे चेअरमन आ. डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर), संस्थेचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यशस्वी विद्यार्थ्याला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सारिका कोळी, उपराचार्य प्रा. संजय फलके, क्रीडा शिक्षक दादासाहेब मगदूम यांचे मार्गदर्शन लाभले.