अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा पुरुष गटाचा संघ जाहीर

कोल्हापूर - आंध्र प्रदेश नेल्लूर येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा पुरुष गटाचा संघ जाहीर झाला. 4 मे पासून 8 मे पर्यंत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर दहा दिवस एकत्र सराव शिबिर आयोजित करण्यात आले.
या संघात एकूण 16 खेळाडूंचा समावेश करण्यात आला असून संघामध्ये आकाश कदम, (कर्णधार) विक्रांत माने,ऋषिकेश संपकाळ, आदित्य राज पाटील ,रोहन बाबर, वैभव गाडे, अनिकेत गुजले, रोहन डोंगळे, ऋतिक पाटील, अतितोष मिश्रा, सुशांत वाघमारे, प्रथमेश गोरे, प्रज्वल पाटील ,योगेश कुराडे, ऋतुराज पाटील , पृथ्वी अर्जुन तसेच प्रशिक्षक सुहास वाघ व संघ व्यवस्थापक प्रा. सचिन पाटील यांची निवड करण्यात आली.
या संघाला कुलगुरू प्रा डॉ. डी. टी. शिर्के, प्र कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही . एन. शिंदे , संचालक क्रीडा व शारीरिक शिक्षण प्रा. डॉ .शरद बनसोडे यांचे प्रोत्साहन लाभले.