केडीसीसी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी जी. एम. शिंदे यांना रिझर्व बँकेची मान्यता

कोल्हापूर (प्रतिनिधी) - केडीसीसी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रभारी मुख्य कार्यकारी म्हणून कार्यरत असलेल्या जी. एम. शिंदे यांच्या नावाला रिझर्व बँकेने मान्यता दिली आहे. त्याबद्दल बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्य कार्यकारी शिंदे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
शिंदे यांच्या नावाची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून शिफारस संचालक मंडळांने रिझर्व बँक ऑफ इंडियाकडे केली होती. रिझर्व बॅंकेच्या "फिट अँड प्रॉपर" या तत्त्वानुसार शिंदे यांची पात्रता असल्यामुळे त्यांच्या नावाला मंजुरी मिळाली.
केडीसीसी बँकेच्या मुख्य कार्यकारी पदी जी. एम. शिंदे यांच्या नावाला रिझर्व बँकेने मान्यता दिल्याबद्दल बँकेचे अध्यक्ष व मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. यावेळी संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर उपस्थित होते.