कोल्हापूर जि.प कर्मचारी सोसायटीच्या चेअरमन पदी संदीप मोरे तर व्हा. चेअरमनपदी जयकुमार रेडेकर यांची बिनविरोध निवड.

कोल्हापूर जि.प कर्मचारी  सोसायटीच्या चेअरमन पदी संदीप मोरे तर व्हा. चेअरमनपदी जयकुमार रेडेकर यांची बिनविरोध निवड.

कोल्हापूर (प्रतिनिधी):कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी नंदिप आकाराम मोरे व व्हा.चेअरमनपदी जयकुमार श्रीकांत रेळेकर यांची 28 फेब्रुवारी 2026 रोजी बिनविरोध निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी आध्यासी अधिकारी म्हणून चंद्रकांत इंगवले होते. चेअरमन पदासाठी नंदिप मोरे यांना श्रीकांत चव्हाण सूचक व सातापा मगदूम यांनी अनुमोदन दिले, तसेच व्हाईस चेअरमन पदासाठी जयकुमार रेळेकर यांना सुनील पाटील सूचक व रवींद्र जरळी यांनी अनुमोदन दिले.

जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीने सहकारामधील दीपस्तंभ व उल्लेखनीय कारभाराबाबत नावलौकिक प्राप्त केले आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांची मातृसंस्था असलेल्या या संस्थेने जिल्हा परिषदेतील अनेक विभागातील कर्मचारी यांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि कौटुंबिक उत्कर्ष करण्यामध्ये या संस्थेने नेहमीच मोलाचा हातभार लावलेला आहे, अशा या संस्थेने चांगल्या प्रकारे आर्थिक गरुड झेप घेतली असून संस्थेच्या सभासदांचे हिताचे काम करण्यास आम्ही सर्व संचालक व सुकानू समिती कटिबद्ध आहोत अशी ग्वाही दिली. भविष्यात संस्थेच्या नावलौकिकात भरीव वाढ करण्याचे नियोजन असून यापुढेही संस्थेचा कारभार सुकाणू समितीच्या मार्गदर्शनानुसार व सर्व संचालकांच्या सहकार्याने सभासदांच्या हिताचा व पारदर्शकपणे काटकसरीने करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांनी सांगितले. या निवडी वेळी श्रीकांत चव्हाण, सुनील पाटील, रवींद्र जरळी, सातापा मगदूम, सुधाकर कांबळे, सचिन गुरव, उत्तम वावरे, रणजीत पाटील, मुजम्मिल नावळेकर, अमर पाटील, जितेंद्र वसगडेकर, राहुलराज शेळके, सुरेश सुतार, अजय शिंदे, संजय शिंदे, बाजीराव पाटील, सरदार दिंडे, सरोजिनी कोरी, सोनाली गुरव, दीपक बुरुड, अशोक पाटील यांच्यासह संस्थेचे मार्गदर्शक एम. आर. पाटील, विश्वास साबळे, महावीर सोळांकुरे, एम. एम. पाटील, के. आर कीरुळकर, राजाराम वरुटे, राजीव परीट, रविशकुमार पाटील, मनोहर भाट, सातापा मोहिते, अजित मगदूम, शांताराम माने, विजय टिपुगडे, प्रतिभा शिर्के, एन डी पाटील, अनिल आवळे, किरण मगदूम, दगडू परीट उपस्थित होते.