आयएस कोड मानांकनांप्रमाणे स्ट्रक्चरल डिझाईन असावे - प्रा. श्रीधर कांबळे

आयएस कोड मानांकनांप्रमाणे स्ट्रक्चरल डिझाईन असावे - प्रा. श्रीधर    कांबळे

कोल्हापूर (प्रतिनिधी) - स्ट्रक्चरल इंजिनअर्स यांनी आयएस कोड मानांकनांप्रमाणे डिझाईन करावे असे प्रतिपादन ज्येष्ट प्राध्यापक श्रीरंग कांबळे यांनी केले. ते इंडियन सोसायटी ॲाफ स्ट्रक्चरल इंजिनीअर्स कोल्हापूर सेंटरच्यावतीने पन्हाळा येथे आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेत बोलत होते. यावेळी पन्हाळा प्रांताधिकारी समीर शिंगटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 श्रीरंग कांबळे पुढे म्हणाले,  स्ट्रक्चरल इंजिनीअर्स यांनी उत्तम स्ट्रक्चरल डिझाईन कसे करावे. यामध्ये कोणती दक्षता घेतली पाहिजे. कोणत्या गोष्टी कराव्यात अथवा करु नयेत, याबाबत सविस्त माहिती दिली. तसेच स्ट्रक्चरल डिझाईनमधील बारकावेही त्यांनी उदहारणासह सांगितले. प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी ते स्वत: सिव्हील इंजिनअर असल्याने प्रशासनामध्ये राहून इंजिनअरींग नॉलेजचा वापर करुन दैनदिन कामकाज गतीने करत येत असल्याचे सांगितले. 

इंजिनअर हेमंत वडळकर यांनी दीर्घायुषी इमारती बद्दल तांत्रिक माहिती दिली. इंजि. शिवदत्त पाटणे, इंजि. नारायण कोचक, इंजि. प्रशांत हडकर यांनी स्ट्रक्चरल डिझाईन करताना येणारी आव्हाने यावर चर्चासत्रात सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी, सकाळच्या सत्रामध्ये इंजि. प्रवीण पिसे यांनी उपस्थतींचे योगा वर्ग घेतला. यानंतर हेरिटेज वॉक दरम्यान दगडी बांधकाम विषयातील तज्ञ डॉ. महेश वर्मा यांनी पन्हाळ्याची तटबंदी आजची परिस्थीती, स्ट्रक्चरल इंजिनिअरींग अनुषंगाने पाहणी करुन त्याबदल विस्तुर्त माहिती उपस्थितींना दिली. तटबंदीची तसेच पन्हाळा किल्ला दरवाजांमधील स्ट्रक्चरल संदर्भातील बारकावे समजावून सांगितले. इंजि. एम.जी. गाडगीळ यांनी पोस्ट टेंशन स्लॅब या विषयावर सविस्तर माहिती तसेच भुकंप प्रणव भागात पोस्ट टेन्शन स्लैबचा वापर करताना घ्यावयाची काळजी ही माहिती दिली. इंजि. अच्युत वाटवे, डॉ. चेतन पाटील, इंजि. सुरेश बच्चे यांनी स्ट्रक्चरल इंजिनिअर यांची जबाबदारी आणि कर्तव्ये, कायदेशीरबाबी याबद्दल चर्चासत्रामध्ये सविस्तर मार्गदर्शन केले. 

सदर कार्यशाळेत हवामानातील बदल त्या अनुषंगाने अतिवृष्टी, भूकंप, वादळे यांचा इमारतीवर होणारा परिणाम व स्ट्रक्चरल डिझाइन या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. 

यावेळी इंडियन सोसायटी ॲाफ स्ट्रक्चरल इंजिनीअर्स, कोल्हापूर सेंटरचे चेअरमन इंजि. प्रशांत हडकर, व्हाईस चेअरमन इंजि. मंदार आंबेकर, सेक्रेटरी इंजि. जीया मोमीन तसेच कोल्हापूर सेंटर कार्यकारिणी सदस्य, कार्याशाळा आयोजन कमिटी सदस्य, स्ट्रक्चरल इंजिनअर सभासद, प्राध्यापक, विद्यार्थी तसेच मान्यवर उपस्थित होते.