महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या वतीने नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार

महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या वतीने नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार

उंचगाव  प्रतिनिधी - उंचगाव येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या वतीने नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात गांधीनगर पंचायत समिती सदस्या सौ. संगीता बाळासाहेब यादव तसेच उंचगाव पंचायत समिती सदस्य तानाजी कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक करताना स्वप्निल साठे यांनी उंचगावचा राजकीय सुसंस्कृतपणा अत्यंत चांगला असून गावात सलोखा व एकोप्याचे वातावरण असल्याचे सांगितले.

तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दत्तात्रय यादव यांनी आपल्या मनोगतात गावाच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून उंचगावातील मुलांसाठी सुसज्ज व दर्जेदार खेळाचे मैदान उपलब्ध करून द्यावे, तसेच अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला पाणीप्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी त्यांनी केली.यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी गावातील मतदारांच्या सर्व समस्या सोडविण्यास प्राधान्य देऊ. उंचगावचा सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दत्तात्रय यादव यांनी केले. या प्रसंगी तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय यादव, पोलीस पाटील स्वप्निल साठे, बाबासाहेब कदम, अनिल अवघडे, छत्रपती विकास सेवा सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब यादव तसेच सामाजिक कार्यकर्ते जयसिंग वळकुंजे आदी उपस्थित होते.