भिकारी महिलेच्या झोळीत सापडले तब्बल 'इतके' रूपये ; नागरिक थक्क

भिकारी महिलेच्या झोळीत सापडले तब्बल 'इतके' रूपये ; नागरिक थक्क

उत्तराखंड - उत्तराखंडमधील रुडकी येथे एका भिकारी महिलेच्या झोळीत तब्बल एक लाख रुपयांहून अधिक रोख रक्कम सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या १३ वर्षांपासून एका घराबाहेर राहणाऱ्या या महिलेच्या झोळीत एवढी मोठी रक्कम आढळल्याने स्थानिक नागरिक थक्क झाले.

हा प्रकार रुडकीतील मंगलौरमधील पठानपुरा परिसरात घडला. स्थानिकांनी महिलेला त्या ठिकाणाहून हटवण्याचा प्रयत्न केला असता, तिच्या झोळीतून नोटांचे बंडल बाहेर पडले. तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी झोळीतील रक्कम जप्त करून मोजणी केली असता ती एक लाख रुपयांपेक्षा थोडी जास्त असल्याचे समोर आले.

महिला अनेक वर्षांपासून त्या भागात राहत होती आणि कोणाशी फारशी बोलत नसे. त्यामुळे तिच्याबद्दल कोणालाही जास्त माहिती नव्हती. एवढी मोठी रक्कम तिच्याकडे कशी जमा झाली, हा प्रश्न स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येणार आहे. जप्त केलेली रक्कम एका विश्वासू व्यक्तीच्या ताब्यात दिली जाणार असून, तिच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. चोरीचा धोका लक्षात घेता पोलिसांनी परिसरात सतर्कता वाढवली आहे.

सध्या पोलिसांकडून महिलेची ओळख पटवण्याचे आणि ती एवढी रक्कम कशी मिळवली याचा सविस्तर तपास सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात एकच चर्चेचा विषय बनला आहे की, रस्त्यावर राहणाऱ्या या भिकारीणीकडे एवढी मोठी रक्कम कशी आली?