काव्या मारन अडचणीत; BCCI ची पहिली प्रतिक्रिया

काव्या मारन अडचणीत; BCCI ची पहिली प्रतिक्रिया

मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादच्या मालकीण काव्या मारन या सध्या नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. इंग्लंडमधील द हंड्रेड लीगसाठी सनरायझर्स लीड्स संघाने पाकिस्तानी फिरकीपटू अबरार अहमदला कोट्यवधी रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतले आहे. या निर्णयानंतर सोशल मीडियावर काव्या मारनवर जोरदार टीका होत असून त्यांना ट्रोलही केले जात आहे. या वादानंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) देखील प्रतिक्रिया दिली. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्टपणे सांगितले की हे प्रकरण बोर्डाच्या अधिकार क्षेत्रात नाही. 

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय फ्रँचायझींनी पाकिस्तानी खेळाडूंना संधी देऊ नये, अशी मागणी काही चाहत्यांकडून होत आहे. मात्र काव्या मारनच्या मालकीच्या सनरायझर्स लीड्सने हा नियम पाळला नाही, असा आरोप सोशल मीडियावर केला जात आहे.

   या संपूर्ण वादावर बीसीसीआयचे उपाध्यक्ष आणि काँग्रेस खासदार राजीव शुक्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, हा विषय आमच्या अधिकारक्षेत्रात येत नाही. ही खरेदी आयपीएलसाठी नाही, तर परदेशी लीगसाठी करण्यात आली आहे. त्यामुळे याबाबत निर्णय त्या फ्रँचायझीनेच घ्यायचा आहे. बीसीसीआय यामध्ये काही करू शकत नाही.

   काव्या मारन या भारतातील प्रसिद्ध उद्योगपती असून त्या सनरायझर्स हैदराबाद संघाच्या मालकीण आहेत. आयपीएलदरम्यान त्या नेहमी संघासोबत स्टेडियममध्ये उपस्थित असतात. मात्र पाकिस्तानी खेळाडूची खरेदी केल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे. काही चाहत्यांनी तर त्यांना आयपीएलमधून बाहेर काढण्याची मागणीही केली आहे.

  अबरार अहमदला सनरायजर्स लीड्सनं 190000 पौंड म्हणजेच जवळपास 2.34 कोटी रुपयांना खरेदी केलं. पाकिस्तानी फिरकीपटू अबरार अहमद याच्यावर सुरुवातीला ट्रेंट रॉकेटसनं बोली लावली होती. त्यांनी अबरार अहमदसाठी  एक लाख पौंड इतकी बोली लावली होती. यानंतर सनरायजर्स लीडसनं 190000 पौंड बोली लावत अबरार अहमदला संघात घेतलं.  विशेष म्हणजे भारतीय मालकीच्या फ्रँचायझीकडून खरेदी होणारा तो या स्पर्धेतील पहिला पाकिस्तानी खेळाडू ठरला आहे.