मुख्याध्यापकांचा शिक्षण अधिकाऱ्यांवर कार्यालयातच बेल्टने हल्ला ; नेमकं काय आहे प्रकरण..?

मुख्याध्यापकांचा शिक्षण अधिकाऱ्यांवर कार्यालयातच बेल्टने हल्ला ; नेमकं काय आहे प्रकरण..?

सीतापूर - उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यात एका सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाने शिक्षण अधिकाऱ्यावर त्यांच्या कार्यालयात बेल्टने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, संबंधित मुख्याध्यापकाला पोलिसांनी अटक केली आहे.

महमूदाबाद परिसरातील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक ब्रिजेंद्र वर्मा यांच्यावर त्यांच्या शाळेतील एका सहाय्यक शिक्षकाला त्रास देत असल्याचा आरोप होता. यासंदर्भातील एक तक्रारीचं पत्र चौकशीसाठी सादर करण्यात आलं होतं, जे नंतर राजकीय वर्तुळात व्हायरल झालं. याच पार्श्वभूमीवर, मूलभूत शिक्षण अधिकारी (BSA) अखिलेश प्रताप सिंह यांनी मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षकाला आपल्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावलं होतं. चौकशीदरम्यान वाद उफाळून आल्यानंतर, ब्रिजेंद्र वर्मा यांनी टेबलावरील फाईल जोरात आपटली, त्यानंतर स्वतः चा बेल्ट काढून अखिलेश सिंह यांना मारहाण केली.

https://x.com/Benarasiyaa/status/1970514724820283876?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1970514724820283876%7Ctwgr%5Ef038b907416c2b5062814717070fa34e4a59f2ab%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fmaharashtratimes.com%2Findia-news%2Futtar-pradesh-government-school-headmaster-beaten-up-education-officer-with-belt%2Farticleshow%2F124086871.cms

सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना स्पष्टपणे दिसून आली आहे. कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करत वर्मांना रोखलं आणि कार्यालयाच्या आवारात त्यांना अडवलं. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी वर्मांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.