नोव्हेंबरमध्ये घडलेली 'ती' घटना , १५ जणांचा मृत्यू , विद्यार्थ्यांचे रोज १५ मिनिटं आंदोलन अन् पंतप्रधानांचा राजीनामा

नोव्हेंबरमध्ये घडलेली 'ती' घटना , १५ जणांचा मृत्यू , विद्यार्थ्यांचे रोज १५ मिनिटं आंदोलन अन् पंतप्रधानांचा राजीनामा

माझा महाराष्ट्र ऑनलाईन : देशातील दुसरं सर्वात मोठं शहर असलेल्या नोवी सॅड येथील रेल्वे स्टेशनच्या छताचा काही भाग कोसळून नोव्हेंबरमध्ये  पंधरा जणांचा मृत्यू झाला. याच्या निषेधार्थ  देशभरात विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करत सरकारविरोधात एल्गार पुकारण्यात आला. यानंतर परिवहन मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आला. मात्र, विद्यार्थ्यांचा रोष वाढतच चालल्याने पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला. सर्बियाचे पंतप्रधान मिलोस वुसेविक यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, त्याच्या हकालपट्टीसाठी नोव्हेंबरपासून देशभरात निदर्शने सुरू होती. 

नोवी सॅड घटनेत तेरा जणांवर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले होते. त्यात माजी परिवहन मंत्री गोरान वेसिक यांच्या नावाचाही उल्लेख होता. मात्र, या घटनेनंतर काही दिवसांनी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र आंदोलकांचा संताप कमी झाला नाही. या आंदोलनात विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. ते देशभरात दररोज रात्री 11.52 वाजता 15 मिनिटे वाहनांची वाहतूक रोखत असत. याच वेळी रेल्वे स्थानकावर बाल्कनी पडून अपघात झाला होता. याशिवाय देशातील विद्यापीठांमधील अभ्यासही ठप्प झाला होता.

जेव्हा नोव्ही सॅड रेल्वे स्टेशन बांधले गेले तेव्हा वुसेविक शहराचे महापौर

वुसेविक 2012 ते 2020 पर्यंत नोवी साडचे Novi Sad महापौर होते. यावेळी रेल्वे स्थानकावर इमारतीसंदर्भातील कामे करण्यात आली. त्यामुळे वुसेविकवर पद सोडण्याचा प्रचंड दबाव होता. मिलोस वुसेविक यांनी नोव्ही सॅडचे महापौर मिलान ज्युरिक देखील मंगळवारी पद सोडतील, असे जाही केले. तथापि, सर्बियामध्ये खरी सत्ता राष्ट्रपतींकडे असते. सध्या सर्बियाचे अध्यक्ष अलेक्झांडर वुकिक आहेत. पंतप्रधानांच्या राजीनाम्यामुळे आंदोलकांचा राग कमी होईल आणि ते वाटाघाटीच्या मार्गावर परततील अशी आशा आहे, असे वुकिक म्हणाले.