शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा

शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना प्रकृती बिघडल्याने तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या मते, त्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यात सकारात्मक सुधारणा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. शरद पवारांना आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

  राष्ट्रवादीचे नेते, खासदार शरद पवार यांची प्रकृती बिघडल्यामुळे काल संध्याकाळी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बारामतीतून येथून पुण्यातील रुबी रुग्णालयात आणऊन त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. बारामतीमध्ये असताना सकाळी डॉक्टरांची एक टीम शरद पवार यांची तपासणी करण्यासाठी गेली होती. त्यानंतर दुपारीदेखील पवारांच्या गोविंदबागेत डॉक्टरांची टीम गेली होती. अखेर त्यांना पुण्यात हलवण्यात आलं. त्यावेळी त्यांची कन्या सुप्रिया सुळे यादेखील उपस्थित होत्या.

  दरम्यान शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दल रुग्णालयाकडून वेळोवेळी अपडेट्स देण्यात येत असून त्यांच्या प्रकृतीबद्दल आता नवी माहिती समोर आली आहे.शरद पवारांच्या प्रकृतीबाबत रुबीहॉल क्लिनिक कडून महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे. पवारांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे, अशी माहिती रुग्णालयातील डॉक्टर सायमन ग्रँट यांनी सकाळी दिली. शरद पवारांची प्रकृती आता स्थिर असून ते बरे होत असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं. काल त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर काही उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना होत असलेला त्रास आता काही प्रमाणात कमी झाल्याचही डॉक्टरांचं म्हणणं आहे.