उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा दौरा

कोल्हापूर (प्रतिनिधी) - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार, 17 ऑगस्ट रोजी दुपारी 1.45 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने जुना बुधवार पेठ पोलीस लाईन, कोल्हापूरकडे प्रयाण. दुपारी 2 वाजता राजर्षी छत्रपती शाहू पोलीस संकुल व कुरुंदवाड ता. शिरोळ येथील पोलीस ठाण्याचे उद्घाटन. (स्थळ: जुना बुधवार पेठ पोलीस लाईन, कोल्हापूर) दुपारी 2.40 वाजता दसरा चौक, कोल्हापूरकडे प्रयाण. दुपारी 2.45 वाजता दसरा चौक येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वाजता मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ: छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल समोर, भाऊसिंगजी रोड, दसरा चौक, कोल्हापूर) दुपारी 3.40 वाजता मेरी वेदर स्कूल, नागाळा पार्क, कोल्हापूरकडे प्रयाण. दुपारी 3.50 वाजता मेरी वेदर स्कुल, नागाळा पार्क येथे आगमन व राखीव. दुपारी 4 वाजता मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचे उद्घाटन- मुख्य कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ: मेरी वेदर ग्राऊंड, नागाळा पार्क, कोल्हापूर) सायं. 6.30 वाजता कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण. सायं. 6.45 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण.