मोबाईल द्यायला नकार दिल्याने विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल

मोबाईल द्यायला नकार दिल्याने विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल

छत्रपती संभाजीनगर - सध्या तरूण पिढीतील बरेच तरूण, तरूणी कोणत्या ना कोणत्या कारणाने आत्नहत्या करत आहेत. त्यामुळे आत्महत्येचं प्रमाण खूप वाढलेलं पहायला मिळत. अशीच एक मनाला चटका लावणारी दुर्देवी घटना तिसगाव येथील खवड्या डोंगरावर घडली. आईकडे नवीन मोबाईलची मागणी केली असता आईने नवीन मोबाईल द्यायला नकार दिल्या कारणाने अकरावीत शिक्षण घेणाऱ्या सोळा वर्षीय विद्यार्थ्याने रागाच्या भरात आईसमोरच खवड्या डोंगरावरून उडी घेऊन आत्महत्या केली. आईने त्याचा पाठलाग केला मात्र तोपर्यंत त्याने खवड्या डोंगरावरून उडी मारून आत्महत्या केली होती. पोटच्या गोळ्याने डोळ्यादेखत जीव गमावल्याने अथर्वच्या आईने घटनास्थळी टाहो फोडला.

अथर्व गोपाल तायडे (वय १६, वडगाव) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तायडे कुटुंबीय हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील रहिवासी आहे. गोपाल तायडे व पत्नी शितल तायडे यांच्यात वाद झाला असल्यामुळे ते वेगळे राहतात. अथर्व हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. तो सध्या शरणपूर येथील दिल्ली पब्लिक स्कूल येथे अकरावीच्या वर्गात शिकतो. अथर्व तायडे याच्या आत्महत्येमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.