AI सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी - विश्वासराव पाटील

AI सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी  - विश्वासराव पाटील

करवीर (विश्वनाथ मोरे) - आधुनिक काळात बदलत चाललेले शेतीचे स्वरूप, निसर्ग व हवेतील बदल या सर्व घटकांचा शेतावरील पिकांच्यावर परिणाम होत आहे. यासाठी AI सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी म्हणून संघाच्या माध्यमातून जवळपास 11 कंपन्यांच्याकडून औषधे व इतर सेवा पुरवणे तसेच शेतकऱ्यांना योग्य खते व सेवा देणे हेच रयत संघाचे उद्दिष्ट आहे असे रयत संघाची 63 वी सर्वसाधारण सभेसमयी गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील यांनी सांगितले. ही सभा खेळमेळीत पार पडली.

या सभेची सुरुवात रयत संघाचे संस्थापक कै. श्रीपतराव बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करणारे कै.एस आर पाटील यांच्या फोटो पूजनाने करण्यात आली. ज्ञात अज्ञात व्यक्तींचे निधन झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अहवाल वाचन रयत संघाचे मॅनेजर तानाजी निगडे यांनी केले.यावेळी विश्वासराव पाटील यांची कोल्हापूर जिल्हा सहकार बोर्ड संचालकपदी निवड झाल्याने सभासद यांचेवतीने सत्कार करण्यात आला. तसेच गुुणवंत कामगार विजय पांडुरंग पाटील बालिंगा यांचा मार्गदर्शक विश्वासराव पाटील, रयत संघाचे चेअरमन सचिन पाटील, उपाध्यक्ष व संचालक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रतिवर्षी प्रामुख्याने अनेक विकास सेवा संस्था, खाजगी कृषी सेवा व वैयक्तिक शेतकरी हे मिश्र खत व आदी रयत संघाकडून खरेदी करणाऱ्याचा रिबेट चेक देऊन सत्कार करण्यात आला.

या सभेसाठी संघाचे मार्गदर्शक विश्वास पाटील, चेअरमन सचिन पाटील, व्हा. चेअरमन शिवाजी देसाई, सर्व संचालक मंडळ, कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन सचिन पाटील,आदी मान्यवर, सर्व विकास सेवा संस्थेचे सचिव, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत रयत संघाचे चेअरमन सचिन विश्वासराव पाटील यांनी प्रास्ताविकमध्ये रयत संघाच्या विकासाठी नेहमी कटिबद्ध आहोत असे सांगितले. अहवाल वाचन तानाजी निगडे आणि आभार व्हा. चेअरमन शिवाजीराव देसाई यांनी केले.