भारतीय जनता पार्टीच्या वतीने तिरंगा पदयात्रा उत्साहात संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधी) - स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महानगरच्या वतीने मोठा उत्साहात तिरंगा पदयात्रा संपन्न झाली. भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांच्या मध्ये मोठा उत्साह दिसून आला. भारत माता, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेतील कलाकार या पदयात्रे मध्ये सहभागी झाले होते.
बिनखांबी गणेश मंदिर या ठिकाणी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र येत सर्वांनी हाता मध्ये तिरंगा ध्वज घेत पदयात्रेची सुरुवात होऊन महाद्वार रोड परिसर पापाची टिकटी मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी पदयात्रा विसर्जित करण्यात आली. भारतीय सैन्याची दिमागदार कामगिरी असणारे ऑपरेशन सिंधूरची छायाचित्राचा फलक लक्षवेधी ठरला.
याप्रसंगी बोलताना नामदार चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, स्वतंत्र दिनाच्या पूर्ण संध्येला आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने जी भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली आहे त्याचा उद्देशच हा आहे की आज रोजी देशाची जी फाळणी झाली त्या फाळणी दरम्यान असंख्य हिंदू नागरिकांची हत्या करण्यात आली, माता भगिनींची विटंबना करण्यात आली या सर्व गोष्टी ध्यानात राहण्यासाठी व अखंड आणि समर्थ भारत पुन्हा एकदा उभा करण्यासाठी आपण सर्व जण कटिबद्ध होऊया.
तसेच सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक व ऑपरेशन सिंधूरने संपूर्ण जगाला भारत देशाने दाखवून दिले आहे की हा समर्थ व बलवान भारत आहे जर तिकडून एक गोळी निघाली तर इकडून तोफांचा भडीमार होईल हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे.
याप्रसंगी महेश जाधव, विजय जाधव, विराज चिखलीकर, अमर साठे, राजू मोरे, धनश्री तोडकर, हेमंत आराध्य, जयराज निंबाळकर, अमोल पालोजी यांच्यासह आदी उपस्थित होते.