सैयारा चित्रपटाने पार केला 'इतक्या' कोटींचा टप्पा पार, ठरला ब्लॉकबस्टर

मुंबई - सन ऑफ सरदार २ प्रदर्शित झाल्यानंतरही ‘सैयारा’ चा प्रभाव काही कमी झालेला नाही. अहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या मुख्य भूमिका असलेला म्युझिकल रोमँटिक ड्रामा सैयाराने प्रेक्षकांच्या मनात घर केलं असून, जगभरात धमाकेदार कामगिरी करत ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे.
वायआरएफ आणि अक्षय विधानी निर्मित या चित्रपटाने नवोदित कलाकार असूनही बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड केली आहे. सैयारा हा अहान पांडे आणि अनीत पड्डा यांचा सर्वात मोठा डेब्यू ठरला आहे. केवळ १८ दिवसांतच या चित्रपटाने तब्बल ५०७ कोटींचं एकूण कमाई केली आहे.
चित्रपटाचं दिग्दर्शन मोहित सूरी यांनी केलं असून, त्याने ग्लोबल बॉक्स ऑफिसवर २८ कोटींची सुरुवात केली होती. पहिल्या आठवड्यातच २०० कोटींचा गल्ला जमवण्यात यश मिळालं, तर १६ दिवसांत वर्ल्डवाईड कमाई ४७८.१६ कोटींवर पोहोचली होती.
https://x.com/taran_adarsh/status/1952675740841046485
अहवालानुसार, सैयाराने ५०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करत, दक्षिणेचा सुपरहिट चित्रपट पोन्नियन सेल्वन-१लाही मागे टाकलं आहे. मणिरत्नम दिग्दर्शित या चित्रपटाने २०२२ मध्ये ४९८ कोटींचं कलेक्शन केलं होतं. त्या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन आणि चियान विक्रम प्रमुख भूमिकेत होते.
सैयारा - वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिस रिपोर्ट (तीसरा आठवडा) -
भारत: ₹३७६ कोटी
विदेशात : ₹१३१ कोटी
एकूण वर्ल्डवाईड: ₹५०७ कोटी / $५८.२८ मिलियन (४ ऑगस्ट २०२५ पर्यंत)
तिसऱ्या आठवड्यातील भारतातील कमाई:
शुक्रवार : ₹५ कोटी
शनिवार : ₹७ कोटी
रविवार : ₹८.२५ कोटी
सोमवार : ₹२.५० कोटी
- तिसऱ्या आठवड्यातील एकूण नेट कमाई: ₹२२.७५ कोटी
- भारतामध्ये एकूण नेट कमाई: ₹३०८ कोटी