बुलेट ते वंदे भारत; मोदींच्या आवाहनाला देवाभाऊंचा प्रतिसाद

बुलेट ते वंदे भारत; मोदींच्या आवाहनाला देवाभाऊंचा प्रतिसाद

मुंबई (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच मंत्र्‍यांनी आपल्या दौऱ्यात कपात केली असून ताफ्यातील गाड्यांची संख्याही कमी केली आहे.काही नेते, मंत्री आणि आमदार, खासदारांनी चक्क ईलेक्ट्रीक वाहनांची खरेदी केल्याचंही दिसून आलं. तर, मुख्यमंत्री महोदयानी चक्क बुलेटवरुन विधानभवन गाठलं होतं.आधी बुलेटस्वारी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज शिर्डी दौऱ्यासाठी चक्क वंदे भारतने प्रवास केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानानंतर मुख्यमंत्र्‍यांनी आज थेट रेल्वेने प्रवास केला.

 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शिर्डी असा प्रवास मुख्यमंत्री वंदे भारत रेल्वेने करणार आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वंदे भारत रेल्वेने नाशिक मार्गे शिर्डीला गेले, त्यावेळी नाशिक रोड रेल्वे स्थानकावर भाजप पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्‍यांच्या स्वागताला धाव घेतली होती.विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी आपले शासकीय कामकाज मुंबई ते शिर्डी प्रवासादरम्यान वंदे भारत ट्रेनमध्येच केले, यावेळी फडणवीसांनी काही फाईल्सवर स्वाक्षरी देखील केल्या.शिर्डी एमआयडीसीमध्ये निबे समूहाच्या संरक्षण उत्पादन कॉम्प्लेक्सचे उदघाटन आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्याहस्ते होत असून त्यासाठी त्यांनी वंदे भारतने शिर्डी गाठली.