शिवसेनेकडून राजन साळवी विधानपरिषदेच्या रिंगणात? वक्तव्याने चर्चांना उधाण
मुंबई (प्रतिनिधी) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकांसाठी सध्या अनेक जण तयारी करत आहेत.अनेक जण इच्छुक देखील आहेत. कोकणातील रायगड - रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या विधानपरिषद जागेसाठी सध्या शिवसेनेतून राजन साळवी यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. पक्षाने संधी दिली तर निवडणूक लढवायला आवडेल. माझी इच्छा मी माझ्या पक्षातील नेत्यांकडे व्यक्त केलेली आहे अशी प्रतिक्रिया राजन साळवी यांनी 'एबीपी माझा'कडे दिली आहे. सध्या शिवसेनेकडे संख्याबळ जास्त असल्यास देखील राजन साळवी यांनी म्हटलं आहे. पक्ष देईल तो आदेश मान्य असेल. तसेच महायुतीतील जागा वाटपाबाबत तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. काही जागा अदलाबदल देखील होऊ शकतात.असं देखील साळवी यांनी बोलून दाखवले आहे.

विधान परिषदेसाठी महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला ज्यात भाजप १२,शिवसेना ३ आणि राष्ट्रवादी २ असा होता. मात्र, शिवसेनेकडून ७ जागांची आग्रही मागणी धरण्यात आली. सोबतच, काही जागांवर दावा करण्यात आला, ज्या राष्ट्रवादी आणि भाजपच्या वाट्याच्या होत्या. अशात, त्या जागांमध्ये अदलाबदल करत महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरु होती. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवर पण दावा केला गेला. अशातच, जागावाटपावर चर्चा करण्यासाठी आणि तोडगा काढण्याचा प्रयत्न भाजपच्या नेत्यांकडून एकनाथ शिंदेंसोबत चर्चा करत होताना दिसते आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांतील संख्याबळावर महायुतीच्या नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चेस सुरुवात झाली आहे. सदस्य संख्या जास्त असलेल्या पक्षाकडून संबंधित विधानपरिषद जागेवर दावा सांगण्यात येत आहे. या सूत्रानुसार भाजपच्या वाट्याला 12, तर शिवसेनेच्या वाट्याला 3 व राष्ट्रवादीच्या वाट्याला 2 जागा येणार असल्याची माहिती आहे.
याच फॉर्म्युल्याच्या आधारे महायुतीच्या समन्वय समितीमध्ये जागा वाटपावर प्राथमिक चर्चा चर्चा होणार आहे. काही जागांसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये अदलाबदल होणार आहे. येत्या आठवड्याभरात जागा वाटपावर महायुतीत एकमत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




