जिल्हा-परिषद-सदस्यांइतकाच-निधी-तालुका-सभापतींनाही द्या- सभापतींची जि. प. अध्यक्षांकडे-मागणी

जिल्हा-परिषद-सदस्यांइतकाच-निधी-तालुका-सभापतींनाही द्या- सभापतींची जि. प. अध्यक्षांकडे-मागणी

कोल्हापूर/प्रतिनिधी: कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि स्थानिक नागरिकांकडून मूलभूत विकासकामांची जोरदार मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर, तालुका स्तरावर विकासकामांना गती देण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांइतकाच आवश्यक निधी सर्व तालुका सभापतींनाही उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील विविध तालुक्यांच्या सभापतींनी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा  शिल्पा खोत यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

 

मूलभूत सुविधांसाठी निधीची गरज

सभापतींनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, ग्रामीण भागात रस्ते दुरुस्ती, गटारी, पिण्याचे पाणी, स्वच्छता, शाळा दुरुस्ती, सार्वजनिक बांधकामे, समाजमंदिरे, अंतर्गत रस्ते आणि दिवाबत्ती व्यवस्था यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची गरज आहे.

विकासकामांना गती मिळण्यासाठी समान निधीची मागणी

सदर विकासकामे प्रभावीपणे आणि गतीने राबवण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांना जितका निधी दिला जातो, त्याच प्रमाणात तालुका सभापतींनाही तालुका स्तरावर निधी उपलब्ध करून देण्यात यावा. प्रत्येक तालुक्याच्या स्थानिक गरजा आणि प्राधान्यक्रम लक्षात घेऊन या निधीचे नियोजन केल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना त्याचा प्रत्यक्ष आणि थेट लाभ मिळेल, असा विश्वासही सभापतींनी पत्रात व्यक्त केला आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षांना दिलेल्या या मागणी पत्रावर खालील सभापतींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

आर. वाय. पाटील –( सभापती राधानगरी), विक्रमसिंह शामराव पाटील (सभापती, भुदरगड), साताप्पा धोंडीराम पाटील (सभापती, करवीर), सुवर्णा शशिकांत पाटील (सभापती, कागल), अश्विनी अनिल बिरंजे  (सभापती, हातकणंगले), मिलिंद तुकाराम कुरणे (सभापतीशिरोळ), रविंद्र बंडू पाटील (सभापती पन्हाळा),  विलास दत्तात्रय नाईक (सभापती चंदगड), छाया प्रकाश देसाई (सभापती गगनबावडा), प्रियंका तानाजी भोसले (सभापती शाहूवाडी), जयश्री गजानन गाडे (सभापतीआजरा), प्रतिभा यशवंत चव्हाण (सभापती गडहिंग्लज).

या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून सर्व तालुका सभापतींना योग्य त्या निधीची तरतूद करून मंजुरी द्यावी, अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे.