रविकिरण इंगवलेंना तात्काळ अटक करा ; शिवसेना जिल्हाप्रमुखांची पोलीस अधीक्षकांना विनंती

रविकिरण इंगवलेंना तात्काळ अटक करा ; शिवसेना जिल्हाप्रमुखांची पोलीस अधीक्षकांना विनंती

कोल्हापूर/प्रतिनिधी : खंडणी आणि विविध गुन्ह्यांखाली जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असलेला फरार आरोपी रविकिरण इंगवले याला पोलिसांनी तात्काळ अटक करावी, अशी आक्रमक मागणी शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली.

पत्रकार परिषदेत माहिती देताना शिवसेना प्रतिनिधींनी सांगितले की, गेल्या १५ ते २० दिवसांपासून फरार आरोपी रविकिरण इंगवले याचे व्हिडिओ व ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. खंडणीचा गुन्हा दाखल होऊन ८ ते १० दिवस उलटून गेले तरीही पोलीस प्रशासनाला इंगवले सापडत कसा नाही, असा सवाल शिवसेना जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण यांनी उपस्थित केला.

तसेच, रविकिरण इंगवले हा ज्या ठिकाणाहून व्हिडिओ व्हायरल करत आहे, त्याला ज्या घरात किंवा शहरात आश्रय दिला जात आहे, त्या आश्रयदात्यांवरही तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे. इंगवले याने कोराणे कुटुंबावर केलेल्या आरोपांची देखील पोलीस प्रशासनाने योग्य ती शहानिशा करावी. पोलिसांनी तात्काळ ॲक्शन मोडमध्ये येऊन रविकिरण इंगवले आणि त्याच्या सहकाऱ्यांना अटक करून जनतेमध्ये विश्वास निर्माण करावा, अशी मागणी शिवसेनेने पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.