साईनाथ मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीस 1 कोटी 27 लाख नफा

साईनाथ मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीस 1 कोटी 27 लाख नफा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : साईनाथ मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने मार्च 2026 अखेर उत्कृष्ट आर्थिक कामगिरी करत 1 कोटी 27 लाखांचा ढोबळ नफा झाल आहे. अशी माहिती संस्थेचे चेअरमन उत्तम जाधव यांनी दिली.      

   संस्थेची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत आणि सक्षम असून, यामागे विश्वासू सभासद, ठेवीदार आणि हितचिंतक यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

संस्थेच्या एकूण ठेवी  228 कोटीं पेक्षा अधिक  असून, संस्थेची प्रगती वेगाने होत आहे. संस्थेने सुमारे 91.5 कोटींची गुंतवणूक केली आहे तसेच 149.3 कोटींचे सुरक्षित कर्ज वितरण करण्यात आले आहे. गेल्या आर्थिक वर्षात संस्थेची एकूण आर्थिक उलाढाल सुमारे 483 कोटी इतकी झाली आहे.

संस्थेमार्फत सभासदांना विविध आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये RTGS, ऑनलाइन डिजिटल बँकिंग, SMS अलर्ट सेवा तसेच इतर अत्याधुनिक सुविधा समाविष्ट आहेत. कोअर बँकिंग प्रणालीमुळे सभासदांना कोणत्याही शाखेतून सहज व्यवहार करण्याची सोय उपलब्ध झाली आहे.

सध्या संस्थेमध्ये 200 हून अधिक पतसंस्था व इतर संस्था सभासद म्हणून जोडल्या गेल्या असून, त्यांना उत्कृष्ट सेवा देण्याचा संस्थेचा प्रयत्न सुरू आहे आणि यापुढेही अधिक दर्जेदार सेवा पुरविण्यात येणार आहेत.

अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर संस्थेमार्फत खालील नवीन कर्ज योजना सुरू करण्यात येत आहेत :

Two-Wheeler Loan योजना

Four-Wheeler Loan योजना

Cash Credit (CC) कर्ज योजना

तसेच, संस्थेचा विस्तार आता कोल्हापूर जिल्ह्याबाहेर सिंधुदुर्ग, सांगली, बेळगाव, पुणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये करण्यात येणार आहे.

येत्या काळात Fixed Deposit वरील व्याजदर 1 मेपासून काही प्रमाणात कमी करण्यात येणार असून, सभासदांनी सध्याच्या आकर्षक व्याजदराचा त्वरित लाभ घ्यावा, असे आवाहन चेअरमन  उत्तम जाधव यांनी केले आहे.

संस्थेच्या यशामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व संचालक, कर्मचारी, हितचिंतक आणि सभासदांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. भविष्यातही संस्था अशाच प्रगतीपथावर वाटचाल करत राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.