सभासदांचा विश्वास आणि सहकार्याच्या जोरावर पहिल्याच वर्षी ५ कोटींचा टप्पा गाठला : चेअरमन विश्वास पाटील
सांगरूळ फाटा येथे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी पतसंस्थेची पहिली वार्षिक सभा उत्साहात संपन्न
करवीर/प्रतिनिधी :कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी पतसंस्था कोल्हापूर, शाखा सांगरूळ फाटा, कोपार्डे (ता. करवीर) या शाखेची पहिल्या वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. पहिल्याच वर्षी संस्थेने ५ कोटींची घोडदौड करत मोठी प्रगती साधली आहे.

अध्यक्ष एकनाथ विश्वास पाटील (कुडित्रे), उपाध्यक्ष शिवाजी दिनकर आडनाईक (यवलूज), संचालक सुधीराज आनंदराव पाटील (महे), बाळासो कृष्णात खाडे (सांगरूळ), सर्वेश सरदार पाटील (फुलेवाडी),सरदार शिवाजीराव पाटील (शिरोली दु.),कृष्णात दिनकर जांभळे (खुपिरे), प्रकाश बळवंत देशमुख (आसुर्ले),सागर शामराव पाटील (कोपार्डे),विजय बाबुराव भोसले (कांचनवाडी),संभाजी ज्ञानू वजाई (डिंगवडे), संभाजी सिन्नाप्पा नाईक (फुलेवाडी), भरत प्रकाश सरनोबत (आईदर), सागर शहाजी पाटील (आरळे), मोहन मारुती परीटकर (मोरेवाडी), संचालिका पूनम रणजित पाटील (विंचवडे),२. सुनिता अरुण पाटील (वाकरे) यांच्यासह सभासद उपस्थित होते.




