पर्यावरणपूरक घरगुती गौरी-गणपती विसर्जनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पर्यावरणपूरक घरगुती गौरी-गणपती विसर्जनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

इराणी खण येथे ६०,३५२ गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन

 कोल्हापूर/प्रतिनिधी : घरगुती गौरी-गणपती विसर्जनासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने केलेल्या पर्यायी व्यवस्थेस शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महापौर सौ. रूपाराणी निकम व आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरात एकूण ६०,३५२ घरगुती गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले.

पंचगंगा नदी तसेच शहरातील तलावांचे प्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरात १६० पर्यावरणपूरक कृत्रिम विसर्जन कुंड उभारण्यात आले होते. महापालिकेची यंत्रणा सलग २४ तास (सकाळी ७ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजेपर्यंत) कार्यरत होती. यामध्ये २,५०० हून अधिक कर्मचारी, २०५ टेम्पो-ट्रॉली, ४६० हमाल, ७ जेसीबी, ५ ॲम्ब्युलन्स आणि १० तराफ्यांचा समावेश होता.

कृत्रिम विसर्जन कुंडांना मोठा प्रतिसाद:

गांधी मैदान विभाग: १०,६५५ मूर्ती 

छत्रपती शिवाजी मार्केट विभाग: ,६८६ मूर्ती 

राजारामपुरी विभाग: ,०२१ मूर्ती 

ताराराणी विभाग: ,७९२ मूर्ती 

इराणी खण (थेट): १४,०९२ मूर्ती 

(एकूण ४८,२४६ मूर्तींचे कृत्रिम कुंडांत विसर्जन)

स्वयंचलित यंत्राचा वापर:

इराणी खण येथील स्वयंचलित विसर्जन यंत्राद्वारे १२,१०६ घरगुती गणेशमूर्तींचे सुरक्षित विसर्जन करण्यात आले.

 

१३५ मेट्रिक टन निर्माल्याचे संकलन:

विसर्जनस्थळांवर संकलित झालेल्या १३५ मेट्रिक टन निर्माल्यापासून सेंद्रिय खत बनवण्यासाठी 'अवनी', 'एकटी', 'वसुंधरा' या संस्थांच्या १५० महिला सदस्यांनी आणि आरोग्य विभागाच्या ९५० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

हे निर्माल्य पुईखडी, बापट कॅम्प, कसबा बावडा, दुधाळी व आयसोलेशन हॉस्पिटल येथील प्रक्रिया केंद्रांकडे पाठवण्यात आले.


पंचगंगा नदीकाठ, रंकाळा व इराणी खण परिसरात पहाटेपासूनच विशेष स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला. महापालिका प्रशासन, अग्निशमन दल, आरोग्य विभाग आणि कोल्हापूरकरांच्या संयुक्त सहकार्यामुळे यंदाचा विसर्जन सोहळा पूर्णपणे पर्यावरणपूरक वातावरणात पार पडला.