डीकेटीई टेक्स्टाईलची चार दशकांची १०० टक्के प्लेसमेंटची परंपरा कायम

डीकेटीई टेक्स्टाईलची चार दशकांची १०० टक्के प्लेसमेंटची परंपरा कायम

इचलकरंजी (प्रतिनिधी) : डीकेटीईच्या बी.टेक. टेक्स्टाईल विभागाने सर्व पोग्रॅम कोर्सची गेल्या चार दशकांपासून १०० टक्के प्लेसमेंटची अभेद्य परंपरा यंदाही कायम राखली आहे. देश विदेशातील नामांकित वस्त्रोद्योग कंपन्यांनी विद्यार्थ्यांची निवड करत डीकेटीईच्या उद्योगाभिमुख शिक्षणाची आणि गुणवत्तापूर्ण कौशल्यविकासची मोहोर पुन्हा उमटविली आहे.

डीकेटीई टेक्स्टाईलसाठी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षामध्ये सुमारे ५० हून अधिक कंपन्या कॅम्पस इंटरव्हयूसाठी भेट दिली व एकूण २३८ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्हयूव मधून निवड केली. प्लेसमेंट मिळणा-या विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविणा-या या कंपन्यामध्ये रीलायन्स, रेमण्डस, ट्रायडेंट, वर्धमान, डायस्टर, अदित्यबिर्ला, शाही एक्स्पोर्टस, वेलस्पन, अलोक, लगुना क्लोदींग, इंडोकॉउंट, कॉटनकिंग, कुसुमगर, एवायएम सिंटेक्स, अतुल लि, इपिक ग्रुप, क्लासिक फॅशन अशा आघाडीवरच्या वस्त्रोद्योग कंपन्यांचा समावेश आहे. ही अभूतपूर्व कामगिरी म्हणजेच डीकेटीईच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आणि उदयोग जगतामधील विश्‍वासार्हतेची साक्ष आहे.

या वर्षी ट्रायडेन्ट या कंपनीमध्ये ३ विद्यार्थ्यांची १२ लाख पॅकेजवर विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.  डीकेटीईतील टेक्स्टाईल चे सुमारे ६०० विद्यार्थी दरवर्षी हिवाळी सुटटी च्या काळात महिना भरासाठी देशविदेशात प्रशिक्षणासाठी जातात. या वर्षी एकूण ५४ विद्यार्थ्यांची प्री प्लेसमेंट द्वारे इंटर्नशिप साठी निवड झाली असून त्यांना रु. ७५०० ते ५० हजार पर्यंत इटर्नशिप स्टायपंड देखील मिळाले आहे त्यांनी जून / जुलै मध्ये समर इंटर्नशिप पूर्ण केले आहे.

अभियांत्रिकी शिक्षणासाठी संस्था निवडताना पालक व विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंटचा मागील विक्रम हा महत्वाचा निकष ठरतो. या पार्श्‍वभुमीवर गेल्या चार दशकांपासूनची सातत्यपूर्ण १०० टक्के प्लेसमेंटची कामगीरी डीकेटीईच्या टेक्सटाईल विभागावरील उद्योगविश्‍वाच्या दृढ विश्‍वासाची साक्ष देणारी ठरली आहे

सदर विद्यार्थ्यांस संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्‍वस्त, संचालिका प्रा.डॉ.एल.एस. आडमुठे,उपसंचालक डॉ. यु. जे. पाटील, टीपीओ प्रा.एस.बी. अकिवाटे याचे मार्गदर्शन लाभले आहे.