सलमान खानचं 'हे' वक्तव्य सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल...

सलमान खानचं 'हे' वक्तव्य सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल...

मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, यावेळी ‘बिग बॉस 19’ किंवा त्याच्या आगामी चित्रपटामुळे नव्हे, तर त्याच्या एका विधानामुळे तो चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. नुकताच सलमान खान शाहरुख खान आणि आमिर खानसोबत एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. या कार्यक्रमादरम्यान त्याने केलेले बलुचिस्तानसंदर्भातील वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

एका व्हिडिओ क्लिपमध्ये सलमान खान मध्य पूर्वेत काम करणाऱ्या स्थलांतरितांबाबत बोलताना म्हणतो, "आपल्या देशातील बरेच लोक येथे आले आहेत.  बलुचिस्तानचे लोक, अफगाणिस्तानचे लोक आणि पाकिस्तानचे लोक सर्व येथे काम करतात. या विधानात त्याने बलुचिस्तान आणि पाकिस्तान यांचा स्वतंत्रपणे उल्लेख केल्यामुळे काही नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

https://x.com/JaipurDialogues/status/1979883731583398186?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1979883731583398186%7Ctwgr%5Efd91893d74601fb66b4e36de98e457eb36b09ece%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fzeenews.india.com%2Fmarathi%2Fentertainment%2Fslip-of-tongue-salman-khan-makes-huge-blunder-separates-people-of-balochistan-from-pakistan%2F949172

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एका युजरने लिहिले, "ही एक चूक आहे." तर दुसरा युजर म्हणतो, "माझं खात्रीशीर सांगता येणार नाही की ही चूक होती की मुद्दाम केलं, पण हे मजेशीर वाटलं. सलमानने बलुचिस्तान आणि पाकिस्तान यामधील फरक केलाय."

बलुचिस्तान हा पाकिस्तानच्या नैऋत्य भागातील एक प्रांत आहे. त्यामुळे सलमान खानने केलेल्या वक्तव्यामुळे काही पाकिस्तानी नागरिकांनी नाराजी व्यक्त करत सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू केलं आहे.