डीकेटीई राजवाडयामध्ये दिवाळी पाडव्यानिमित्त ‘या‘ कार्यक्रमाचे आयोजन
इचलकरंजी (प्रतिनिधी) : डीकेटीईच्या राजवाडयामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे दिवाळी पाडव्यानिमित्त ‘ स्वरदीपोत्सव - संतवाणी ‘ हा खास मराठी गीतांचा कार्यक्रम बुधवार २२ ऑक्टोंबर रोजी दुपारी ४.३० वाजता डीकेटीईच्या राजवाडयामध्ये आयोजित केलेला आहे. हा कार्यक्रम डीकेटीई, आपटे वाचन मंदीर व पं.बाळकृष्णबुवा संगीत साधना मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर होणार आहे.

या कार्यक्रमात प.बाळकृष्ण बुवा मंडळ यांचे कलाकार व डीकेटीईचे वाद्यवृंदाचे विद्यार्थी संगीताची कला सादर करणार आहेत. कार्यक्रमानंतर राजवाडयावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई व फटाक्यांची अतिषबाजी देखील करण्यात येणार आहे. तरी याचा लाभ संगीत श्रोत्यांनी घ्यावा व या कार्यक्रमाला येताना पारंपरिक पोषाखात उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.




