सोने - चांदीच्या दरात चढ उतार ; पहा आजचा दर काय..?
मुंबई - सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये सतत चढ - उतार होत असून मागील तीन दिवसांत 24 कॅरेट सोन्याचे दर तब्बल 890 रुपयांनी कमी झाले आहेत, तर 22 कॅरेट सोनं 810 रुपयांनी स्वस्त झाले आहे. चांदीचे भावही सतत घसरत असून एका दिवसात 6,000 रुपयांनी वाढल्यानंतर पुन्हा सलग तीन दिवसांत 7,100 रुपयांची मोठी घट झाली आहे.

चांदीची किंमत 22 नोव्हेंबर रोजी 1,60,900 रुपये प्रति किलो इथे स्थिरावली आहे.
डॉलर मजबूत झाल्यामुळे आणि डिसेंबरमध्ये यूएस फेडचे व्याजदर कमी होणार नाहीत, या शक्यतेमुळे सोन्याच्या किमतींमध्ये दबाव निर्माण झाला आहे. फेड दरकपातीबाबत मतभेद दिसत असून डिसेंबरमध्ये दर कमी होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे सोन्यातील तेजी आटोक्यात राहू शकते. जर दरकपात झाली नाही तर सोन्याचे भाव 2-5% ने घटण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मात्र, फेडने व्याजदर कमी केल्यास सोन्याच्या किमती पुन्हा वाढू शकतात. सध्या सोनं प्रति औंस $38,000 च्या आसपास स्थिर आहे. पुढील वर्षी मात्र सोन्यात वाढीचा कल कायम राहील, असा अंदाज आहे. सोनं जर ₹1 लाखांपर्यंत खाली आले तर खरेदीत वाढ होण्याची शक्यता आहे.
आजचे सोन्याचे दर -
10 ग्रॅम सोनं -
22 कॅरेट : 1,15,350 रुपये
24 कॅरेट : 1,25,840 रुपये
18 कॅरेट : 94,380 रुपये
1 ग्रॅम सोनं -
22 कॅरेट : 11,535 रुपये
24 कॅरेट : 12,584 रुपये
18 कॅरेट : 9,438 रुपये
8 ग्रॅम सोनं -
22 कॅरेट : 92,280 रुपये
24 कॅरेट : 1,00,672 रुपये
18 कॅरेट : 75,504 रुपये
मुंबई - पुणे सोन्याचे दर (10 ग्रॅम) -
22 कॅरेट : 1,15,350 रुपये
24 कॅरेट : 1,25,840 रुपये
18 कॅरेट : 94,380 रुपये




